चंदगड : तालुक्यातील हेरे सरंजाम जमिनी वर्ग दोनच्या वर्ग एक करण्याबाबतचा कायदा अजूनही महसूल विभाग मंत्रालय मुंबई यांनी न केल्यामुळे आशा उंचावलेल्या जमिनी मालकांचा अपेक्षाभंग झाला असून अनेक शेतकरी चंदगड तहसील कार्यालय, गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी कार्यालयात याकामी चकरा मारून मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे कायदा प्रत्यक्षात करावा. तणावग्रस्त शेतकऱ्यांना महसूल विभाग मंत्रालय, मुंबई यांनी दिलासा द्यावा, अशी मगणी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजयभाई पाटील यांनी केली आहे.