गडहिंग्लज : येथील साई इंटरनॅशनल स्कूलचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला सलग गेली तीन वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा स्कूलने यंदाही कायम राखली आहे. दहावीमध्ये सृष्टी रजपूत (९५.८ टक्के), द्वितीय ओंकार पाटील (९४.६ टक्के), तृतीय ईश्वरी पाटील (९३.६ टक्के), चतुर्थ सर्वेश कुराडे (८६ टक्के). पाचवा क्रमांक पार्थ बस्ताडे (८४.८ टक्के) मिळवला. या परीक्षेत एकूण ३७ पैकी ३ विद्यार्थी विशेष श्रेणीत ७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष सतिश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे, सदस्य तुषार पाटील, मुख्याध्यापिका दीपाली कोरडे यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लागले.