शिवराज महाविद्यालयात कॉम्प्यूटर विभागाचा 'सॅक्स २०२३ कार्यक्रम संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात कॉम्प्यूटर विभागाचा ' सॅक्स २०२३ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून के आय. टी. कॉलेज कोल्हापूर येथील प्रा. प्रवीण जाधव हे उपस्थित होते. तर संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांची उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विना-अनुदानित विभाग समन्वयक प्रा. आझाद पटेल यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम समन्वयकः प्रा.बी. एस. पठाण यांनी करून दिला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रा. प्रवीण जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर चांगला नागरिक होणे गरजेचे आहे. विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविण्यासाठी  प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय विद्यार्थ्यांनी  भविष्यात कोठेही गेले तरी आपण घडलेल्या मातृ संस्थेला विसरू नये असे स्पष्ट करून सद्याच्या स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांनी अपडेट राहणे काळजी गरज आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन प्रा. प्रवीण जाधव यांनी केले. संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी शिवराज महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला घडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आम्ही नेहमी कट्टीबद्ध आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. विद्या संकुलामध्ये नव-नवीन उपक्रम व क्रियाशील कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी तत्पर राहिले पाहिजे असे आवाहन केले. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या तसेच विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पुढील प्रवेश घेताना विशेष सवलत देण्यात येत असल्याचे डॉ. अनिल कुराडे यांनी स्पष्ट केले. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड दिग्विजय कुराडे यांनी देखील विद्याथ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले. यावेळी कॉम्प्यूटर विभागाच्या विद्यार्थ्यांना अद्यावत असे ज्ञान प्राप्त यासाठी  'कॅड सेंटर गडहिंग्लज व शिवराज महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
या कार्यक्रमात पोस्टर प्रेझेन्टेशनमध्ये अनुक्रमे श्रीया पाटील, ऐश्वर्या हिरेमठ, गीता पाटील, प्रतीक्षा दोरुगडे, दिव्या केरकर, मानस पाटील पेपर प्रेझेन्टेशनमध्ये अनुक्रमे दिया धरणे, मृणाल केसरकर, सृष्टी कुलकर्णी, शुभम मेंगाणे या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. बी.बी.ए. विभाग प्रमुख प्रा. आर. डी. कमते, बी.सी.ए. विभाग प्रमुख प्रा. के.एस. देसाई, कॉम्प्यूटर विभाग प्रमुख प्रा. दीपिका खांडेकर पंडीत, बी.सी.एस. विभाग प्रमुख प्रा. रवी खोत, प्रा.आय.पी. सुतार, प्रा. एस. के. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.