गडहिंग्लज : गडहिंग्लज लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी दिपाली पट्टणशेट्टी, सचिवपदी सविता वडगुले, खजिनदारपदी उज्वला मार्तड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी (एमजेएफ) विनायक गळतगे यांची निवड झाली. लायन्स क्लबच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या या निवडीत महिला लायन्स सभासदांची विविध पदावर निवड करण्यात आली. सर्वच पदावर महिलांना प्रथमच संधी देण्यात आली यावेळी मावळते अध्यक्ष प्रसाद सभासद विनायक गळतगे, प्रदिप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी प्रांतपाल आण्णासाहेब गळतगे, रिजन चेअरमन राजेंद्र वडगुले, डॉ. सुभाष पाटील, अशोक देशपांडे, प्रकाश शहा, सदानंद सुभेदार, राजशेखर दड्डी, गुरुराज हत्ती, डॉ. आप्पासाहेब आरबोळे, रामगोंडा पाटील आदी उपस्थित होते