पं. दीनदयाळ विद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के

KolhapurLive

आजरा : येथील पं. दीनदयाळ विद्यालयाचा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल१००टक्के लागला आहे. यंदाही  कॉलेजने शंभर टक्केची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये अनुक्रमे जैनबी शेख (८३.५०) (कला शाखा), सायमा चौधरी (७५.५०) (वाणिज्य शाखा), भरत शेडगे (६२.३३) (विज्ञान शाखा) या विद्यार्थ्यांनी पहिले प्रथम क्रमांक पटकाविले. या विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव डॉ. सुधीर मुंज, मुख्य कार्यकारी अधिकारी मलिककुमार बुरूड यांचे प्रोत्साहन लाभले.