गंगापूरच्या बळीराजा अॅकॅडमीची४५ मुले आर्मीसह पोलीस भरती

KolhapurLive

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गंगापूरच्या माळावर गेली बारा वर्षे सुरू असलेल्या अॅकॅडमीने आतापर्यंत ६५९ मुलांना पोलीस, नेव्ही, आर्मीमध्ये भरती केले. तर यावर्षी अॅकॅडमीची २८ पेक्षा जास्त मुले मुली पोलीस दलात व १७ पेक्षा जास्त मुले-मुली आर्मी दलात अशी एकूण ४५ विद्यार्थी- विद्यार्थिनी भरती झाले. तसेच याच अॅकॅडमीतून भरती झालेल्या दिपक खाडे या विद्यार्थ्याने डीआरडीओ पदापर्यंत मजल मारली. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी गारगोटी ते गंगापूरपर्यंत यशस्वी विद्यार्थ्यांची रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी मुलांचा सत्कार करण्यात आला. गंगापूरमध्ये अजित जाधव-पाटील व त्यांच्या पत्नी केतकी अजित पाटील यांनी प्रशिक्षणाची गंगोत्री उभी करून नवजवान या रूपातून कर्तुत्वाचा नवा मानदंड उभा केला आहे. केवळ कोल्हापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील परीक्षार्थी, विद्यार्थी, पालक या निकालाने प्रभावित झाले आहेत. भुदरगड तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता, मानसिक कणखरता किती प्रभावशाली आहे हे या गंगापूरच्या बळीराजा ?कॅडमीच्या कर्तुत्वातून दिसून येते. रात्रंदिवस राबणारा संस्थेचा शिक्षक वर्ग, अनेक कौशल्य आत्मसात करायला लावणारी प्रशिक्षणे, स्पर्धा परीक्षेचा सततचा सराव, प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुरविले जाणारे वैयक्तिक लक्ष, विशेषता मुलींची लक्षणीय संख्या त्यांची राहण्याची निवासाची स्वतंत्र व्यवस्था, अभ्यासिका, सरावासाठी प्रशस्त क्रिडांगण हे सारं काही अचंबित करणारे आहे. इमारत व परिसराच्या मानाने आपली शैक्षणिक गुणवत्ता कितीतरी उंच असल्याचे या बळीराजा ?ॲकॅडमीने दाखवून दिले आहे.

राज्याच्या  कानाकोपऱ्यातून सामान्य घरची मुलं, मुली इथे हे पोलीस दलाचे सैनिक नेव्ही, आर्मीचे शिक्षण प्रशिक्षण घेत आहेत. गंगापूरच्या बळीराजा? अकॅडमी न  या सगळ्या मुला मुलींना आपल्यात सामावून घेतले. गरीब घरच्या मुला बाळाच्या जगण्याचा , त्यांच्या कुटूंबाचा उद्धार केला.