चंदगड काजू बोर्ड स्थापन करण्यामध्ये चंदगड तालुक्याला डावलले, दौलत साखर कारखान्याकडील २०१०- ११ मधील ऊस बीले, काजू बी दराबाबत सोमवार दि. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता वंचित बहुजन आघाडीमार्फत मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
काजू बोर्डबाबत चंदगड तालुक्याचा फेरविचाराची मागणी करणे, सन २०१०-११ च्या गळीत हंगामातील दौलत साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांची ऊस आणि बीले, काजू बी दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत उपाययोजना करणे, याबाबत मोर्चाने निवेदन देण्यात येणार असून चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वंचितचे तालुका प्रमुख प्रा. विष्णू कार्वेकर, आर. पी. कांबळे, संतोष कांबळे यांनी केले आहे.