कुंबळहाळला मंगला देवी,हनुमान यात्रा उत्साहात

KolhapurLive

हलकर्णी : कुंबळहाळ येथे श्री हनुमान व श्री मंगला देवी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडली. सोमवारी हनुमान यात्रा व महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंगळवारी श्री मंगला देवीची यात्रा पार पडली. सकाळपासूनच महिलांनी ओटी भरण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. मंदिरात पूजाअर्चा झाल्यानंतर धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. पंचक्रोशीतील भाविकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. जागृत ग्रामदैवत श्री मंगला देवी यात्रेसाठी पंचक्रोशीतून भाविक मोठ्या संख्येने जमा झाले होते. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी नेटके नियोजन केले होते.