शिवराज महाविद्यालयात बी.एस्सी. केमिस्ट्री तृतीय वर्षाचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात बी. एस्सी. केमिस्ट्री तृतीय वर्षाचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. ए. एम. हसुरे यांनी केले.

या कार्यक्रमात यावेळी संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात खूप संधी आहेत. शिवाय या भागातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एम.एस्सी विभाग कार्यरत आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांनी विद्यार्थ्यांच्या करिअरबाबत व भविष्यातील असणारी आव्हाने याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कु. निकिता सुतार, कु. वैष्णवी देसाई या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रम समन्वयक प्रा. निळकंठ भोसले व केमिस्ट्री विभागाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. अनघा काळे व कु. राधिका देऊळकर यांनी केले तर आभार अमृतनाथ डवरी यांनी मानले.