चंदगड : हेरे सरंजामच्या शेतकऱ्यांसाठी मजरे शिरगाव येथे मंगळवार (दि. ३०) रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी दिली.
शिबिरावेळी गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार राजेश चव्हाण, मंडल अधिकारी अमर पाटील व त्या विभागाचे तलाठी हजर राहून लोकांचे विविध नमुन्यातील अर्ज स्वीकारून पुढील कार्यवाही करणार आहेत. सर्व शेतकऱ्यांनी आपले सातबारा अर्ज व विहित नमुन्यातील अर्ज घेऊन हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शिरगाव सज्जातील सावर्डे, काजिर्णे, मजरे शिरगाव, मौजे शिरगाव, हिंडगाव, फाटकवाडी या गावातील लोकांनी वेळेत उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा.