आजऱ्यात बंद घर फोडले

KolhapurLive

आजरा : येथील आपटे कॉलनीतील बंद घर फोडून दुचाकीसह ४० हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी सुनील नाईक यांनी पोलीसात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नाईक कुटुंबीय कामानिमित्त १२ मे रोजी बाहेरगावी गेले होते. १२ ते १५ मे दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने घराच्या टेरेसवरील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने दुचाकीसह १६ हजार रुपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिने तसेच ६ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष घस्ती करत आहेत.