गडहिंग्लज : येथील तहसील कार्यालयातर्फे सोमवारी तारीख .२९ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन केले आहे. कचेरी रोडवरील बचत भवनात शिबिर होणार आहे. यात गावस्तरावर तक्रारदार महिलांचा शोध घेऊन त्यांच्याकडून तक्रार अर्ज घेणे. व त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेचे महिला लाभार्थी व महिलांच्या प्रलंबित प्रस्तावासह संबंधित महिला लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी केले आहे.