साई इंटरनॅशनलचा शंभर टक्के निकाल

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील साई इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला.शाळेत गायत्री बरगे हिने ९० टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला.मेरीटमध्ये सात विद्यार्थी चमकले.विशेष श्रेणीमध्ये ४३, तर प्रथम श्रेणीत ३१ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. ९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे सदस्य तुषार पाटील यांचे प्रोत्साह लाभले. मुख्याध्यापिका दीपाल कोरडे व शिक्षकांचे विद्याथ्यां मार्गदर्शन मिळाले.