चंदगड ते दड्डी बस पूर्वरत सुरू करा

KolhapurLive


चंदगड, ता. २६ : तालुक्याच्या पूर्व भागातील कर्नाटक सीमेवरील गावांना जोडणारी चंदगड- दड्डी बस पूर्ववत सुरू करावी अशी त्या विभागातील नागरिकांची मागणी आहे. कोरोनात बंद झालेली ही बस अद्याप सुरू केलेली नाही. परिसरातील दहा- बारा गावांतील नागरिकांच्या सोयीच्यादृष्टीने ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आहे

कर्नाटक सीमेलगत असलेल्या चिंचणे, कामेवाडी, नरगट्टे, यर्तेनहट्टी परीसरातील नागरीकांचा कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांशी संपर्क येतो. शाळा, महाविद्यालयांना जाणारे विद्यार्थी, आरोग्य सेवेसाठी जाणारे रुग्ण, शासकीय कामकाजासाठी चंदगडला जाणारे नागरीक, नातेसंबंधामुळे होणारा प्रवास यासाठी चंदगडहून कामेवाडीमार्गे दड्डी

जाणारी बस सोयीची होती अनेक वर्ष ही गाडी सुरू होती. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला होता. परंतु कोरोनात ही गाडी बंद झाली.
त्यानंतर सर्व सेवा पूर्ववत होत असताना एसटी महामंडळाने ही गाडी अद्याप सुरू केलेली नाही. नागरिकांची सोय विचारात घेता ती पूर्ववत करावी अशी मागणी आहे.