गडहिंग्लज : अकरावी प्रवेशासाठी गडहिंग्लज शहरातील महाविद्यालयात यंदा देखील विज्ञान शाखेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव तथा गटशिक्षणाधिकारी एन. बी. हालबागोळ यांनी पत्रकातून दिली आहे. केवळ विज्ञान शाखेसाठी ही प्रक्रिया राबवणार असून या समितीचे अध्यक्ष माध्यमिक शिक्षणाधिकारी, सचिव म्हणून गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य है या समितीचे सदस्य असणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असणार असून दहावीचा निकाल लागल्यानंतर सुरू होणार आहे. या प्रक्रियेतून होणारे प्रवेश शासनमान्य असतील. अन्य कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांनी कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करू नये, अन्यथा असे प्रवेश रद्द ठरविण्यात येणार आहेत.