आजरा : आजरा शहराच्या लगत असलेल्या रामतीर्थ पर्यटनस्थळावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या पर्यटकांकडून वनविभागाकडून कर वसुली केली जात या आहे. ही कर आकारणी तातडीने बंद करावी, अशी नी मागणी सामाजिक कार्यकर्ते कॉ शिवाजी गुरव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे परिक्षेत्र अधिकारी स्मिता डाके यांना देण्यात आले आहे.
आजरा मार्गे कोकण व गोवा याठिकाणी पर्यटनासाठी जाणारा पर्यटक रामतीर्थ येथे येतो. याठिकाणी गेल्या काही वर्षात पर्यटनाच्यादृष्टीने विकासकामे झाली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात रामतीर्थ धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटन वाढत असल्यामुळे तालुक्यातील व्यवसाय वाढत आहे. पण वनविभागाने कर आकारणी सुरू केल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होऊ लागली असून रामतीर्थवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटक तसेच भाविकांकडून आकारणी करण्यात येणारा कर रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर कॉ शिवाजी गुरव, युवराज सपकाळ. अनिल पोवार, निशिगंधा पोवार, आर्यन गुरव, धनाजी ससाणे, सदू शिवणे, स्वागत जाधव, शिवाजी गुडूळकर यांच्यासह भाविकांच्या सहया आहेत.