गडहिंग्लज : साधना ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स विभागाचा बारावी परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला. प्रशालेचा विद्यार्थी राजदीप कतावरे (९४.१७) गडहिंग्लज उपविभागात प्रथम आला. रोहिणी राचान्नावर (८९.१७) सर्वेश तोडकर, मुस्तकीम नूलकर (दोघे ८६.५०) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार केला. संचालक अरविंद बारदेस्कर, संचालिका फिलॉन बारदेस्कर, मुख्याध्यापक जी. एस. शिंदे, पर्यवेक्षक रफिक पटेल, कॉमर्स विभागप्रमुख व्ही. पी. भिऊंगडे आदी उपस्थित होते.