चंदगड तालुक्यातील नागणवाडी येथे गोवा बनावट मद्याचा साठा जप्त राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लजची कारवाई

KolhapurLive


आज दि.१२/०५/२०२३ रोजी मा. आयुक्त श्री. विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.श्री.बी.एच.तडवी. विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग, मा. श्री. रविंद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर, उप अधीक्षकसो श्री आर.एल. खोत यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज विभागाने चंदगड तालुक्यातील नागणवाडी येथे छापा टाकून गोवा बनावटी मधाचे एकूण ३७ बॉक्स जप्त केले असून यामध्ये एकूण रु.१८०९६०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मा. श्री. रविंद्र आवळे, अधीक्षकसो, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर यांचे आदेशानुसार गोवा बनावट मद्याची विक्री व वाहतूक कोल्हापूर जिल्हयात होवू नये यासाठी कारवाईचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने चंदगड तालुक्यात गस्त घालत असताना किरण पाटील उप निरीक्षक, चंदगड यांना नागणवाडी गावात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा केल्याची बातमी मिळाली त्यानुसार नागणवाडी ता. चंदगड गावाच्या हद्दीत गोवा बनावटी मद्याचे वेगवेगळया ब्रॅण्डचे ३७ बॉक्स मिळून आले. यामध्ये नामदेव भिमाण्णा सावंत. व. व. ५२. रा. नागणवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर यास ताब्यात घेण्यात आले..

सदर कारवाई श्री. एम. एस. गरुड, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज, श्री. किरण आ. पाटील, उप निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंदगड, श्री. एस. आर. ठोंबरे सहा. दु निरीक्षक, जवान वर्ग श्री.बी.ए.सावंत. श्री. एस.बी चौगुले. श्री. ए. टी. थोरात यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. एम. एस. गरुड, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लन हे करत आहेत.