आमदार हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने बेरोजगारांचे व्यवसाय फुलले

KolhapurLive

कागल : केडीसीसी बँकेकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अर्थसाहाय्यातून रोजगार वाढून बेरोजगारांचे व्यवसाय फुलले,  कागल निवासस्थानी आमदार हसन साहेब मुश्रीफ हस्ते कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण झाले.

केडीसीसी बँक सर्वच प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर आहे. मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसायाभिमुख करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अण्णासाहेब पाटील योजनेमधून प्रकरणे सुरू आहेत. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांना आर्थिक स्थैर्य देवून व्यवसायाभिमुख करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे योगदान मोठे आहे. मराठा समाजासह इतर मागासवर्ग समाजासाठीही उद्योग, व्यवसाय व रोजगारवाढीच्या दृष्टीने तरुणांनी केडीसीसी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.
             
यावेळी हारूण सय्यद,दिलीप शिंदे,रामगोडा ऊफॅ गुडया पाटील, राहूल शिरकोळे आदी प्रमुख उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज मंजूर झालेल्याची नावे अशी.....

संदीप आण्णा आडावकर-रा.गडहिंग्लज,अक्षय शंकरराव जाधव रा.गडहिंग्लज