अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी तर्फे न्यु इंग्लिश स्कूल, मुगळी येथे एएफसी ग्रासरूट्स डे साजरा

KolhapurLive


दि १६/०५/२०२३ रोजी अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी आणि एटी फाऊंडेशन तर्फे न्यू इंग्लिश स्कुल, मुगळी येथे एएफसी ग्रासरुटस डे साजरा करण्यात आला. आशिया खंडातील विविध देशामध्ये संपूर्ण आठवडाभर हा दिवस साजरा केला जातो. सर्वप्रथम २०१३ मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. २०१३ ते २०१९ पर्यंत म्हणजेच तब्बल ७ वर्षे आपल्याच भागातील कन्या अंजू तुरंबेकर यांनी संपूर्ण भारत देशाच्या एएफसी ग्रासरूट्स फुटबॉल डे आणि फुटबॉल विकासाच्या कार्याची जबाबदारी निभावली. 

सदर पार पडलेल्या प्रोग्रॅम मध्ये न्यु इंग्लिश स्कूलच्या ३५ मुला-मुलींनी सहभाग नोंदविला. प्रोग्रॅम मध्ये खेळाडूंसाठी विविध मजेदार अॅक्टीव्हिटज घेण्यात आल्या. याचबरोबर खेळाडूंसाठी "वैयक्तिक विजेता फुटबॉल स्पर्धा" घेण्यात आली. मुलांमध्ये सिद्धार्थ धनवडे विजयी, गौतम माने उपविजयी,तर मुलींमध्ये लक्ष्मी माने विजयी आणि अनुजा पाटील उपविजयी ठरली. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू, एएफसी ए परवानाधारक प्रशिक्षिका, अकॅडमी आणि फाउंडेशनच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांनी मुलांमधील गुण ओळखून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे असे वक्तव्य केले आणि अकॅडमी तर्फे विशेषतः खेडेगावातील खेळाडूंसाठी अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी आणि एटी फाऊंडेशन तर्फे सतत खेळाच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाप्रसंगी सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे, उपसरपंच संतोष भोसले, मुख्याध्यापक ए. ए. कांबळे सर, शिक्षक प्रशांत महाजन, महेंद्र रणनवरे, मुकुंद शिंदे, सुनील सागर, दत्तात्रय संघमित्र, अनिल शिंत्रे, अनिल पाटील, सदस्य चंद्रकांत माने डी.पी. पाटील रवींद्र माने शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत भोसले सदस्य परशराम कडलगे उपस्थित होते.

यावेळी अकॅडमीच्या हेड कोच आणि फाऊंडेशनचे सदस्य भक्ती पवार, अल्तमश खान, आकांक्षा माळगी, अश्विनी पाटील या प्रशिक्षकांनी सहकार्य केले.