गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालामध्ये भौतिकशास्त्र विभागामार्फत 'उर्जा स्रोतांचे संवर्धन व पर्यावरणपूरक जीवनशैली' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम.कदम होते तर संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. प्रवीण गंदूगडे यांनी केले. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात साधना व्होकेशनलचे प्रा. विश्वनाथ गोरुले यांनी 'उर्जा स्त्रोतांचे सर्वधर्म- या विषयावर मार्गदर्शन करताना पारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर आपण कशा संवर्धन'- पाधाद्तीने करावा तसेच किती प्रमाणात करावा शिवाय त्याचे दुष्यपरिणाम मानवी जीवनावर कोणता प्रभाव टाकतात. त्याचबरोबर वैश्विक तापमानवाढ कशा पद्धतीने होत आहे. त्यासाठी आवश्यक पर्याय व पर्यावरणपूरक असे अपारंपरिक उर्जा स्त्रोत आपल्याला किती प्रमाणात उर्जा देतात असे स्पष्ट करून त्यांनी लहान व मोठे अपारंपरिक उर्जा स्त्रोत प्रकल्प कसे उभारू शकतो याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. व्दितीय सत्रात ग्रीन फ्रेंडस अग्रोचे श्री दयानंद देसाई यांनी 'पर्यावरणपूरक जीवनशैली' या विषयावर मार्गदर्शन करताना रोजच्या टाकाऊ पदार्थापासून आपण कसे उत्पन्न कशा पद्धतीने उत्पन्न मिळवू शकतो. त्यामधून पर्यावरणाचे संवर्धन व उत्पन्नाचे साधन असा दुहेरी फायदा कशा पद्धतीने घेऊ शकतो. माती हवा पाणी