उत्तूर : हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने उत्तूर जि. प. मतदारसंघात गावोगावी कॅम्प लावून आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करण्यात आली होती. या कार्डचा वितरण शुभारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.
मुश्रीफ फौंडेशन शाखा उत्तूर येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्तूर विभागाचे प्रमुख वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, शिरीष देसाई, संभाजी कुराडे, अनिकेत कवळेकर, दशरथ आजगेकर, सुनील दिवटी, संभाजी तांबेकर, बापू निऊंगरे, सुशांत गुरव, नजिर लमतुरे, सुधीर सावंत, विजय गुरव, तुषार घोरपडे, वसंत कोंडूसकर, प्रमोद तारळेकर, शिवप्रसाद आमणगी, अजित खोराटे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.