गडहिंग्लज : राज्य शासनाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानाअंतर्गत गडहिंग्लज नगरपालिकेच्या वतीने 'मेरी लाईफ' 'मेरा स्वच्छ शहर' उपक्रम हाती घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर रिड्यूस, रियुज आणि रिसायकल म्हणजेच 'आरआरआर' केंद्राची स्थापना करण्यात आली. बॅ. नाथ पै विद्यालयात या केंद्राची स्थापना केली असून यावेळी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. घरातील जुनी कपडे, प्लास्टिक साहित्य, ई-उपकरणे, कपडे आदी विनाउपयोगी साहित्याचे संकलन या ठिकाणी केले जाणार आहे. पालिकेचे वतीने ई-रिक्षाच्या माध्यमातून शहरातून एकत्र केले जाणार असून सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे केंद्र सुरू राहणार आहे. एकत्रित केलेल्या वस्तूची गरज नागरिकांना असेल त्यांनी केंद्रातून घेता येईल अशा या उपक्रमात शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावेत, असे आवाहन पालिकेच्या वतीने केले आहे.' यावेळी अधिकारी श्वेता सुर्वे, अवंती पाटील, जयवंत वरपे, प्रशांत शिवणे, धनंजय चव्हाण, संतोष मराठे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.