हरपवडेत रासुबाई मंदिराचा वास्तूशांत सोहळा उत्साहात

KolhapurLive

आजरा : हरपवडे येथील श्री रासुबाई मंदिराचा वास्तूशांत सोहळा उत्साहात पार पडला. देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या अधिपत्याखाली श्री रासूबाई देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, रासाई देवी ग्रामविकास सेवा प्रतिष्ठाण आणि हरपवडे ग्रामस्थांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वागत रासूबाई देवस्थान मंडळ हरपवडेचे सचिव, रासाई देवी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्रावण घाटोचे यांनी केले. रामनाथगिरी समाधी मठ, कसबा नूलचे मठाधिपती भगवानगिरी महाराज व आर. वाय. पाटील यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले. यावेळी मुकंद देसाई, सुधीर देसाई, अशोक चराटी, उदय पवार, दौलती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री रासूबाई देवस्थान अध्यक्ष संजय हळवणकर, संचालक बाबासो पाटील, राजाराम पाटील, दत्तात्रय पोवार, जयराम कांबळे, आनंदा हळवणकर, रामराव जाधव, एकनाथ सुतार, बाळू केसरकर, सागर तिपे, सुरेश पाटील, धनाजी पाटील यांच्या मदतीने हा कार्यक्रम पार पडला. धनाजी सावंत यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.