चंदगड : इनाम कोळींद्रे येथे नवीन बांधलेल्या दलित वस्तीमधील समाज मंदिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. येथील जुने समाज मंदिर अपुरे पडत असल्यामुळे धोंडीबा कांबळे, प्रकाश कांबळे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्याकडे पाठपुरावा केला असता सचिन बल्लाळ यांनी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आपल्या निधीमधून ७.५० लाख रूपये मंजूर केले. नवीन समाज मंदिर बांधण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी भरमू पाटील, सचिन बल्लाळ, अनिल शिवणगेकर, सुरेश सातवणेकर, मनिषा देशपांडे, सदानंद देशपांडे, प्रकाश कांबळे, काशिनाथ कांबळे, सुनील कांबळे, धाकलू कांबळे, सागर कांबळे, संदीप गावडे उपस्थित होते.