शिनोळीत हातभट्टीची दारू जप्त, चंदगड पोलिसांची कारवाई

KolhapurLive

शिनोळी खुर्द येथील वसंत सूर्यवंशी यांच्या काजूच्या बागेत गावठी दारू बनवण्याचे ७०० लिटर तयार रसायन व पाच लिटर युरिया असा ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी लक्ष्मण परसराम नाईक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चंदगड पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी, शिनोळी खुर्द येथील वसंत सूर्यवंशी यांच्या काजूच्या बागेत हातभट्टीची दारू बनवली जात असल्याची माहिती चंदगड पोलिसांना मिळाली.त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नाईक करीत आहे.