चंदगड : येथील फादर अग्नेल सीबीएसई स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विशेष प्राविण्यासह विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. निलेश देसाई ९६, रितिका कुंदेकर ९६, ध्रुवा देशपांडे ९५, जिया पिरजादे ९४, अलेक्स डिसोजा ९४. वैभव गावडे ९१, तन्मय गावडे ९१ टक्के यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले. त्यांना मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल, फादर मिलाग्रेस, फादर लॉनजिनस, शिंदे टीचर, आफ्रिजिन टीचर, सुरेखा आजरेकर, इमरान पठाण यांचे मार्गदर्शन लाभले.