पी.सी पाटील गुरुजी पतसंस्थेची निवडणूक जाहीर

KolhapurLive

येथे पी.एस पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षण सहकारी पतसंस्थेचे 17 जागेसाठी 10 जून रोजी निवडणूक जाहीर झाली आहे.आज पासून १२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत पंधरा मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. पात्र उमेदवारांची यादी 16 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 30 मे पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीचा मुदत ठेवण्यात आली आहे.

   दिनांक 30 मे पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर दि. 31 मे रोजी चिन्हाचे वाटप होणार आहे. 10 जून रोजी मतदानाची तारीख निश्चित केली आहे. सर्वसाधारण प्रतिनिधी गटाच्या बारा अनुसूचित जाती अथवा जमाती प्रतिनिधी गटाचे एक, महिला गटाच्या दोन, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटाची एक, भटक्या जमाती अथवा वि. मागास प्रवर्ग गटाची एक, आशा 17 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. सहाय्यक निबंधक अमित गराडे यांनी ही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आहे