कर्नाटकच्या बहुतांश नवनियुक्त आमदारांनी पसंती दिल्यामुळे मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्यांची निवड निश्चित मानली जात होती. मात्र शिवकुमार यांनी बुधवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘दहा जनपथ’वर भेट घेतली. तिथून शिवकुमार हे ‘दहा राजाजी’ रोडवरील खरगेंच्या निवासस्थानी गेले. त्यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर शिवकुमार यांनी, ‘मुख्यमंत्री पदासंदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही’, असे पत्रकारांना सांगितले. या विधानामुळे शिवकुमार माघार घेणार नसल्याचे स्पष्ट
सिद्धरामय्या यांनी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ‘दहा जनपथ’वर राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा लगेचच केली जाईल, असे संकेत पक्षाकडून देण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री होणार नसेल तर फक्त आमदार म्हणून पक्षासाठी काम करत राहीन, अशी ताठर भूमिका शिवकुमार यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंशी झाले. सिद्धरामय्यांनी दोन वर्षे मुख्यमंत्री पदी राहावे, त्यानंतर ३ वर्षे हे पद शिवकुमार यांना दिले जाईल वा सिद्धरामय्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री राहावे व शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद, महत्त्वाची खाती सांभाळावीत. तसेच, प्रदेशाध्यक्षपदीही कायम राहावे, असे दोन प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यातील एकही प्रस्ताव शिवकुमारांनी स्वीकारलेला नाही.
नेमकं काय ठरलं?
दरम्यान, काल झालेल्या बैठकांनंतर मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांची निवड निश्चित मानली जात आहे. “काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाने सिद्धरामय्या, शिवकुमार आणि काँग्रेसच्या इतर नेतृत्त्वासोबत चर्चा केली”, अशी माहिती कर्नाटकच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा पुष्पा अमरनाथ यांनी माहिती दिली. त्या पुढे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री पदाच्या नावावर सिद्धरामय्या यांचं शिक्कामोर्तब झालं आहे.
दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या बंगळुरूतील घराबाहेर जल्लोष सुरू झाला असून शिवकुमार यांच्या समर्थकांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. परंतु, मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापही चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. “पुढच्या ४८ ते ७२ तासांमध्ये कर्नाटकात नवं मंत्रिमंडळ स्थापन होईल. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही आश्वासित केलेल्या पाचही कामांना मंजुरी देणार असून ग्रॅण्ड कर्नाटक बनवण्यासाठी तयारी सुरू करणार आहोत”, असं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे इनचार्ज रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सांगितलं.
आज पुन्हा बैठक
काँग्रेसने गुरुवारी सायंकाळी सात वाजता बंगळुरूमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निरीक्षकांना सीएलपी बैठक आयोजित करण्यासाठी बंगळुरूत पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.