अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी आणि एटी फाऊंडेशन तर्फे एएफसी ग्रासरूट्स फुटबॉल डे साजरा

KolhapurLive


दि १५/०५/२०२३ रोजी अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी आणि
एटी फाऊंडेशन तर्फे गडहिंगलज हायस्कूल गडहिंग्लज येथे ग्रासरूट्स फुटबॉल डे साजरा करण्यात आला. एएफसी ग्रासरूट्स फुटबॉल डे हे आशियाई महासंघाचे १० वे वर्ष असून संपूर्ण आशिया खंडातील विविध देशांमध्ये साजरा केला जात आहे. 

अकॅडमीच्या खेळाडू आणि पालकांसोबत विविध फुटबॉल अॅक्टीव्हिटीज घेऊन हा दिवस साजरा करण्यात आला. सहभागी खेळाडू आणि पालकांमधील विजयी ठरलेल्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आणि अकॅडमी व फाऊंडेशनच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोग्रॅम पार पडला. यावेळी अकॅडमीच्या हेड कोच आणि फाऊंडेशनचे सदस्य भक्ती पवार, अल्तमश खान, जुनेद नंदीकर,आकांक्षा माळगी, प्रसाद कुलकर्णी यांनी सहकार्य केले.