गडहिंग्लज, ता. ५ : भडगाव येथील समर्थनगरमधील श्री समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने १४ ते १६ एप्रिल दरम्यान निवासी बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. किसन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ५ ते ८ वीमध्ये शिकत असलेल्या मुला-मुलींसाठी हे शिबिर होणार आहे. शिबिरात योगाभ्यास, लाठीकाठी, प्रात्यक्षिक, हस्तकला, विज्ञान खेळणी, चित्रकला प्रात्यक्षिक यांचे मार्गदर्शन आणि चांगल्या सवयी, मनाचे श्लोक, मुलांसाठी प्रवचनाचे आयोजन केले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ११ एप्रिलपूर्वी नावे नोंदवण्याचे आवाहन केले आहे. ट्रस्टच्या अध्यक्षांनी केले आहे.