पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आयपीएल २०२३ मध्ये सलग दुसरा विजय मिळवला. गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ केवळ १९२ धावा करू शकला. त्यामुळे त्यांना पाच धावांनी विजय मिळता आला. या सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) कडून गोलंदाजीत नॅथन एलिसने सर्वाधिक ४ बळी घेतले.
सातत्याने विकेट्स गमावल्यामुळे राजस्थानने सामना गमावला –
या सामन्यात १९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रविचंद्रन अश्विनला राजस्थान रॉयल्सच्या सलामीला यशस्वी जैस्वालसह मैदानात पाठवण्यात आले. यशस्वी जैस्वालने आपल्या डावातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, मात्र त्यानंतर ८ चेंडूत ११ धावा काढून तो अर्शदीपचा बळी ठरला. यानंतर फलंदाजीला आलेल्या जोस बटलरने अश्विनसोबत वेगाने धावा करण्यास सुरुवात केली.
धवन आणि प्रभसिमरनने पंजाबला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले –
या सामन्यातील पंजाब किंग्ज संघाच्या खेळीबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग या जोडीने फलंदाजीत खूप महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामध्ये दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी झाली होती. या सामन्यात प्रभसिमरन सिंगने ३४ चेंडूत ६० धावा केल्या.
या सामन्यात शेवटपर्यंत फलंदाजी करताना कर्णधार शिखर धवनने ५६ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८६ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. पंजाब संघाला २० षटकांत ४ गडी गमावून १९७ धावा करता आल्या. राजस्थानकडून सामन्यात जेसन होल्डर २ तर रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांना १-१ बळी घेता आला.