रेडेकर हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबिर

KolhapurLive

भादवण, ता. २५ : पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये दोन दिवसांचे उन्हाळी शिविर झाले. व्यंकटराव हायस्कूलचे कलाशिक्षक कृष्णा दावणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी चित्रकलेतील विविध बारकावे शिकवले. जलरंग, तैलरंग यासह पोट्रेट याची माहिती दिली.
नवकृष्णा व्हॅली उत्तूरचे इंग्रजी शिक्षक रामकृष्ण मगदूम यांनी इंग्रजी भाषेत बोलणे याबाबत मार्गदर्शन केले. एस. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नेसरीच्या माजी प्राचार्या प्रणिता शिपूरकर यांनी कथाकथनातून विद्याथ्र्यांना छान गोष्टी सांगत मंत्रमुग्ध केले. यु. के. जाधव यांनी आभार मानले.