महागाव, ता. २५ : संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थितीत संस्थचे विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण व सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एच. एस सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अभियांत्रिकीमधील माजी विद्यार्थ्यांनीमनोगत व्यक्त केले.
उपस्थितीत माजी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले. डॉ. यशवंत चव्हाण व ॲड. बाळासाहेब चव्हाण यांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉ. संजय चव्हाण, तुषार यमगेकर, सायली चव्हाण उपस्थित होते. समन्वयक म्हणून प्रा. ए. ए. देशपांडे यांनी काम पाहिले. प्रा. एस. आय. जबडे यांनी आभार मानले.