गडहिंग्लज : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती, भीमनगर यांच्या वतीने 14 एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वकृत्व स्पर्धा, बुधवारी सायंकाळी उदय भोसले यांचा पोवाडा सादर होणार आहे. परिसरातील नागरिकांसाठी रांगोळी स्पर्धा, विविध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तर शुक्रवारी 14 एप्रिल रोजी सकाळी समता ज्योतीचे स्वागत, प्रतिमा पूजन, ध्वजारोहन होणार आहे. तर सायंकाळी शहरातून भीमनगर येथून शोभयात्रेचे आयोजन होणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे,तहसीलदार ऋषिकेश शेळके, पोलीस निरीक्षक गजानन सनगर, मुख्यअधिकारी स्वरूप खारगे,गटविकास अधिकारी शरद मगर यांचे प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.