गडहिंग्लजच्या बौद्ध विहारसाठी निधी द्या-बापू म्हेत्री शिष्टमंडळाचे आठवलेना निवेदन

KolhapurLive

गडहिंग्लज : बसस्थानकामागे खुल्या जागेवर टाकलेल्या संस्कृतीक केंद्र व वाचनालयाचे आरक्षण रद्द करून बौद्ध विहाराची इमारत आणि उर्वरित जागेत पार्किंग, सार्वजनिक उड्डाण विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या  सामाजिक न्याय व इतर विभागातून निधी मिळावा ,अशी मागणी माजी नगराध्यक्ष बापू म्हेत्री यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे.

  याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शासनामार्फत पालिकेला विविध कामासाठी पुरस्कार ही मिळाले आहेत. बसस्थानकामागे एक हेक्टर पाच आर जमीन पालिका मालिकीची आहे. दुसऱ्या सुधारित आराखड्यात सांस्कृतिक केंद्र व वाचनालय म्हणून आरक्षण आहे. हे आरक्षण रद्द करून जागेवरील बौद्ध विहाराचे इमारत बांधावी उर्वरित जागेवर पार्किंग, उडान विकसित करावे. त्यासाठी निधीही मिळावा, अशी मागणी आहे.

    दरम्यान, शहरात विविध महापुरुषांचे पुतळे आहेत. बसस्थानकासमोर दसरा चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले,अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णकृती पुतळे शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व अन्य निधीतून बसविण्यात यावेत.हे पुतळे उभारल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. निवेदनावर मनोहर दावणे,सिद्धार्थ बन्नी, डॉ. डी .जी,चिंघळीकर, सुरेश दास पुनम म्हेत्री, अमर म्हेत्री,इकबाल सनदी ,गंगाराम पुजारी, सुरेश कांबळे, विठ्ठल चुडाई, दिगंबर विटेकरी, जितेंद्र कांबळे आदीच्या सह्या आहेत.