महागाव : येथील संत गजानन रुरल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील शिप्पूर येथील एका अंध रुग्णाच्या डाव्या बाजूच्या गुडघ्यावर सहा तासाच्या अथक प्रयत्नातून डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. कर्नाटक सुवर्ण आरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया मोफत झाली. अशक्यही शक्य करून दाखवत संत गजानन हॉ स्पिटलच्या टीमने रुग्णाला जीवदान दिले आहे.
कर्नाटकातील शिप्पूर येथील ज्योतिराम तिबिले (वय ५५) हे जन्मताच अंध आहेत. त्यांना दोन वर्षापासून गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे चालणेही त्रासदायक होत होते. त्याच्या निदानासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. त्याला यश मिळाले नाही. शेवटी महागाव येथील हॉ स्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर असल्याचे समजले. येथील निदानानंतर शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले.
शस्त्रक्रिया यशस्वी तत्काळ बडोदा गुजरात येथील युनिक आर्थ कंपनीचे अजय सुतारिया व सिद्धेश माने यांना संपर्क साधून दोन लाख किमतीचा कृत्रिम अवयव मागविण्यात आला. डॉ. अनिल पाटील व इतर टीमने सहा तासाच्या अथक प्रयत्नातून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. प्रतिमा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण या टीमसह कर्नाटक सुवर्ण आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रशांत होटगीमठ यांचे यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले.
गेल्या दोन वर्षापासून अंध असलेल्या काकांना डाव्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान दिले. संत गजानन महाराज हॉस्पिटलच्या टीमने शस्त्रक्रिया करण्यासाठी होकार दर्शवून तत्काळ निर्णय घेऊन मोफत शस्त्रक्रिया यशस्वी केली. याबद्दल हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा आभारी आहे. असे रुग्णाचे नातेवाईक गजानन तिबिले यांनी सांगितले.