गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस यांची भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून सेविकांच्या ४ जागेसाठी ६०, तर मदतनीसच्या २४ जागेसाठी १६५ अर्ध दाखल झाले आहेत. अर्जांची तालुकास्तरीय समितीकडून छाननी होणार असून यानंतर गुंतवणूक यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.तालुक्यातील अंगणवाडी सेविका ४, तर मदतनिसाची २४ पदे रिक्त आहेत. गेले पंधरा दिवस भरती प्रक्रियेमध्ये अर्ज भरणे प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी दिनांक २० रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. यामध्ये एकूण २२५ अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या अर्जांची प्राथमिक छाननी प्रक्रिया चालणार असून त्यानंतर अन्य तालुक्यातील समितीकडून छाननी केली जाईल. त्यानंतर संबंधित गावच्या ग्रामपंचायतीत कच्चे गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर तक्रारीसाठी दहा दिवसांची मुदत दिली जाणार असून त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.