आजरा : दि. आजरा अर्बन को- ऑप. बँक लि. आजरा (मल्टीस्टेट) या बँकेकडे गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सात कोटी १८ लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी पत्रकातून दिली आहे. ग्रामीण भागात स्थापन झालेली व शहरी भागात शाखा असणाऱ्या बँकेवर सभासद, ठेवीदार व हितचिंतकाचा दृढ विश्वास आहे. ग्राहकांनी बँकेत मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. सध्या बँकेकडे ७७७ कोटींच्या ठेवी व ५०१ रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संचालक, ठेवीदार, सभासद व हितचिंतकांचे सहकार्य मिळत असल्याचे अध्यक्ष डॉ. देशपांडे यांनी सांगितले.