मेडिकल असो. च्या स्पर्धेत केदारी रेडेकर वैद्यकीय संघ विजयी

KolhapurLive

गडहिंग्लज : गडहिंग्लज मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा केदारी रेडेकर आयुर्वेदिक संघाने संपूर्ण मालिकेत उत्तम कामगिरी बजावत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. या क्रिकेट स्पर्धा येथील शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर मोठ्या प्रतिसादात पार पडल्या. केदारी रेडेकर आयुर्वेदिक या संघाचे नेतृत्व डॉ. अमोल जाधव यांनी केले होते, तर या संघाचे व्यवस्थापन डॉ. उदयकुमार कोळी यांनी केले. संस्थेच्या अध्यक्ष अंजना रेडेकर,उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, सचिव प्रा. सुनील शिंत्रे, प्राचार्य डॉ. वीणा कंठी, डॉ. पंकज विश्वकर्मा यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.