आजरा, ता. ७ : येथील जनता बँक आजरा या बँकेची निवडणूक लागली आहे. आज अर्ज भरणीच्या अखेरच्या दिवस ४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, रणजित देसाई, महादेव टोपले, बाबाजी नाईक, सहदेव नेवगे, रेखा देसाई, शामराव चौगुले या माजी संचालकानी अर्ज दाखल केले आहेत. सर्वसाधारण प्रतिनिधी गटात २७ महिला राखीव प्रतिनिधी गटात ५, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी गटात ४, विमुक्त जाती भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटात २, इतर मागास प्रतिनिधी गटात ६ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या बुधवार (ता.८) छाननीची प्रक्रिया दुपारी २ वाजताा होईल.