दुंडगे येथे युवकाची गळाफास घेऊन आत्महत्या

KolhapurLive

गडहिंग्लज : दुंडगे गावाजवळील सुतार मळा येथे तरुणाने झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.संदीप किरण सुतार ( वय २८ )असे मृताचे नाव आहे. गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास येताच त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला. याची नोंद गडहिंग्लज पोलीसात झाली आहे. अधिक तपास हवलदार अरुण पाटील करत आहेत.त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, मुलगी,असा परिवार आहे.संदीप हा खाजगी शाळेत नोकरीस होता.