गडहिंग्लज तालुक्यातील ९ पतसंस्थेची निवडणूक जाहीर

KolhapurLive

गडहिंग्लज: तालुक्यातील विविध गावच्या ९ पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे. ७ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. तालुका सरकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अमित गराडे यांनी ही माहिती दिली .
    
       जयभवानी पतसंस्था (हुनगिनहाळ), गौरीनंदन पतसंस्था (हूनगीनहाळ)  जे. पी.नाईक पतसंस्था (गडहिंग्लज),स्वामी विवेकानंद पतसंस्था (औरनाळ) कृष्णा पतसंस्था (गडहिंग्लज) या पतसंस्थेसाठी आजपासून 12 फेब्रुवारी पर्यंत उमेदवार अर्ज भारता येणार आहेत .लक्ष्मी पतसंस्था (मुगळी), श्रमीक भारत पतसंस्था (ऐनापुर) काळभैरव पतसंस्था (हरळी) या संस्थेच्या  आजपासून ११ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. शाहू पतसंस्था (भडगाव) या पतसंस्थेला आजपासून १० तारखेपर्यंत उमेदवार अर्ज भरता येणार आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. निवडणुकीमुळे गावच्या हालचाली वेगावल्या आहेत.