चंदगड, ता.८ : पारगड ते मिरवेल या रस्त्याच्या कामाकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मिरवेल ग्रामस्थांनी २० तारखेपासून येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे. या रस्त्यावर २००८ साली डांबर पडले होते. त्यानंतर अद्याप त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाने रस्त्याची दुर्लशा झाली. अजून चालणेसुद्धा अवघड झाले आहे. यासंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी या रस्त्यासाठी पत्रात लाखांचा निधी मंजूर केला; परंतु अद्याप तो बांधकाम विभागाडे वर्ग झाला नसल्याचे या खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे .याप्रश्नानी दिलेल्या निवेदनावर बुधाजी पवार, विद्याधर बाणे, मनोहर पवार ,रामा पवार, संतोष पवार ,रामाकांत पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.