महागाव : येथील व्यापारी नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय मिरजकर व उपाध्यक्षपदी बाबासाहेब कांबळे यांची बिनविरोधात निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहा.निबंधक एफ.डी. जमादार यांनी काम पाहिले. विजय आरभावी, विजयालक्ष्मी मगदूम, माधव पोटे-पाटील, सुनील पट्टणशेट्टी, रवींद्र धरणगुत्ती, सुनील खटावकर, विश्वास कलाल, शीलाताई कांबळे व जनरल मॅनेजर दशरथ पाटील यांच्यासह संख्येचे कर्मचारी उपस्थित होते.