गडहिंग्लज : गडहिंग्लज व्यापारी नगरी पतसंस्थेला ५० ते ७५ कोटी गटात सन २०२१-२२ या सालातील बँको पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती संस्थाध्यक्ष विश्वनाथ पट्टणशेट्टी यांनी दिली. संस्थेकडे २ कोटी १९ लाख वसूल भागभंडावल असून ६ कोटी ४३ लाख इतका निधी आहे. ५२ कोटी ६३ लाखाच्या ठेवी असून ६३ कोठी ८० लाखाची कर्ज वाटप झाली आहे. संस्थेला सातत्याने ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. गडहिंग्लज कोल्हापूर आणि आजरा येथे संस्थेची शाखा कार्यरत आहे. संस्थेचे उपाध्यक्ष अरुण तेलंग यांच्यासह सर्व संचालक मंडळ, जनरल मॅनेजर शंकर वाडेकर यांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे.