आजरा ता.१ : बहुजन समाजाची बँक अशी ओळख असलेल्या जनता बँक लि., आजरा या बँकेची निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आजपासून अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली आहे.
अर्ज दाखल करण्याची अंतिम दिवस (ता. ७) दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. आज अर्ज भरण्याचा पहिला दिवशी रणजीत देसाई यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.गडहिंग्लजचे सहाय्यक निबंध ए. व्ही. गराडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ८ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता दाखल नामनिदर्शन पत्राचीछाननी, तर माघार घेण्याचे कालावधी ९फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. मतदान प्रक्रिया ५ मार्च रोजी होणार असून, सहा मार्चला निकाल आहे.