आजरा कारखान्याची १५ जानेवारी अखेरची ऊस बिले जमा

KolhapurLive

आजरा  : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची दि १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२२ या कालावधीत गाळप  झालेल्या  ४९९६९ में. टन ऊसाची ३ हजार रुपये प्रमाणे  होणारी  रक्कम  १४ कोटी ६१ लाख रुपयाची ऊस बिले विनाकपात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली आहेत. तसेच १५ डिसेंबरअखेर ६० कोटी  ९८ लाखाची तोडणी वाहतूक बिले  कंत्राठदारांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती चेअरमन सुनील शिंत्रेे यांनी दिली. 
आजरा कारखान्याने आजअखेर  ९३ दिवसात २ लाख  ८९ हजार  २१० रुपये मे टन ऊसाचे गाळप करून सरासरी  ११.९१ टक्के  साखर उतारा असून  ३ लाख  ३३ हजार ३०० क्विंटल साखरेचे  उत्पादना केले आहे. हंगामा  २०२२-२३ मध्ये  कारखान्याने ४ लाख मे‌ टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून  त्याकरिता पुरेशी बीड स्थानिक  तोडणी  वाहतूक यंत्रणा  ऊस तोडणी करिता कार्यरत ठेवली आहे. 
कोल्हापूर  जिल्हा  सहकार्याने  कारखान्याकडे आलेल्या  १५ जानेवारी अखेर ऊसाची  बिले ३ हजार रुपये  प्र.मे.टन विनाकपात एकरकमी होणारी रक्कम अदा केली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने  गाळपासाठी आणण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे. तसेच ज्या क्षेत्रामध्ये पुढील प्रोगॅम  सुरू  झाला आहे. अशा ठिकाणची  यंत्रणा  ज्या  भागात यंत्रणा कमी आहे अशा  ठिकाणी घालून  कारखान्याकडे  जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणून  ऊस उत्पादकांना दिला जात आहे.  काही क्षेत्रांमध्ये जंगली जनावरांचा त्रास होत आहे अशा ठिकाणी यंत्रणा  देऊन सादर ठिकाणाचा ऊस  काढण्याचे  नियोजन  देखीले कारखान्यामार्फत केला आहे. कार्यक्षेत्रात शिल्लक असलेल्या ऊसाची  माहिती घेऊन तो  वेळेत गाळपास आणण्याचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे.  तरी ऊस उत्पादकांनी पिकविलेली ऊस कारखान्यास गाळपास  पाठवून सहकार्य करावे असे आवाहन शिंत्रे  यांनी केले  आहे. यावेळी कारखान्याचे माजी  व्हा. चेअरमन,  संचालक , कार्यकारी संचालक, सेक्रेटरी, अधिकारी उपस्थित होते.