गडहिंग्लज : येथील शिवराज वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न झाला. या अध्यक्षस्थानी डॉ.डी.के. कांबळे होते. प्रारंभी स्वागत प्रा.तानाजी चौगुले यांनी केले.या मेळाव्यामध्ये डिसेंबर २०२२ या परीक्षेमध्ये सी.ए.सी.एम.ए.सी.एस.फाउंडेशन, सी.ए. इंटर परिक्षेत यश मिळविलेल्या सेबेस्टीना बारदेस्कर , प्राजक्ता कांबळे, सिद्धी किलबिले,शुभम पाथरवट, निखिल मुळे, मानसी गुरव, प्राप्ती देसाई, साक्षी चौगुले, रेवती चौगुले, सृजन कुलकर्णी, ज्योती सावंत, स्वीटी बारदेस्कर, पल्लवी राजगोळळर, सुप्रिया पाटिल, प्राजक्ता चोथे, अंकिता चोथे, साक्षी देसाई, साक्षी कुलकर्णी, सुमित चव्हाण, अवधूत यादव, सुशांत पाटील, समित पाटील, मीनल बारदेस्कर, समृद्धी गेंगे या विद्यार्थी व पालकांचा सत्कार केला. करंबळी ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा.तेजस्विनी पाटील यांचा सत्कार केला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.डी.के. कांबळे यांनी शिक्षण व मालक तसेच विद्यार्थी यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे असल्याचे सांगितले. संस्था सचिव डॉ.कुराडे यांनी शिवराजचे विद्यार्थी नामांकित परिक्षेत उतीर्ण होणे. हे आम्हाला भूषणावह आहे. त्यामुळे शिवराजमध्ये लवकरच स्वतंत्र वाणिज्य महाविद्यालय सुरु करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालक गणपत पाथरवट, अमित वंटमुरे,प्रा.नाझीया बोजगर , प्रा नाझीया बोजगर, प्रा. तेजस्विनी पाटील, साक्षी देसाई, मानसी गुरव मनोगत व्यक्त केले. आभार प्रा बियाना वाटंगी यांनी मानले. डॉ. महेश चौगुले यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.