चंदगड , ता.३ : येथील चंदगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तेरा जागांसाठी सहा अपक्षांसह ३२ उमेदवार रिंगणात आहेत. आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी हे चित्र स्पष्ट झाले. सोमवारी ( ता.६ ) चिन्हांचे वाटप होणार असून त्यानंतर प्रचाराला गती येणार आहे. १९ तारखेला मतदान आहे. बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. दरम्याच्या काळात निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले मात्र त्याला यश आले नाही .अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 13 जागेंसाठी तब्बल ३२ उमेदवार रिंगणात राहिले .सोमवारी चिन्हांचे वाटप होणार आहे त्यानंतर प्रचाराला गती येईल १९ तारखेला मतदान व २० तारखेला मतमोजणी होणार आहे.